Header Ads Widget

 


उपळवटे-प्रतिनिधी (संदीप घोरपडे)

            माढा तालुक्यातील उपळवटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी उपळवटे गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. उपळवटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण उपळवटे गावचे नागरिक दत्तात्रेय गरड पाटील व शिक्षण प्रेमी अशोक गरड पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर उपळवटे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण उपळवटे गावचे सरपंच बालाजी गरड पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली. "हर घर तिरंगा" या अभियानात उपळवटे गावातील सर्व नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सामाजिक कार्यकर्ते संदिप घोरपडे यांनी सांगितले कि, भारत देशामध्ये पहिल्यांदाच हर घर तिरंगा लावण्यात आला आहे. हा आनंदाचा क्षण कधीही विसरता येणार नाही. त्याचप्रमाणे शिक्षण प्रेमी अशोक गरड पाटील यांनी सुध्दा त्यांचे विचार मांडले.

         यावेळी उपळवटे गावचे सरपंच बालाजी गरड पाटील, उपसरपंच दीपिका महेश देवडकर, ग्रामपंचायत सर्व सदस्य, संगणक परिचालक अंगद शेळके, ग्रामसेवक बनाते भाऊसाहेब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, जि.प प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आजिनाथ पांडुरंग शिंदे, प्रकाश पांडुरंग भवर, मोळीक हरिदास विठ्ठल, अरविंद विठ्ठल सुरवसे, ज्योतीराम बिभीषण तळेकर, मंदाताई अंकुश खोसे मॅडम, अंगणवाडी सेविका अंजना लोंढे मॅडम, अंगणवाडी मदतनीस शोभा ढगे, प्राथमिक आरोग्य केंद्र सिस्टर देवयानी कदम, कविता गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment