Header Ads Widget

 


टेंभूर्णी-प्रतिनिधी

            कलावती रामा किर्ते यांचे 107 व्या वर्षी मौजे माळेगाव तालुका माढा, येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालेले आहे. त्या माळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच बबन रामा किर्ते यांच्या आई होत्या. तर जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांच्या त्या आजी होत्या. त्यांनी स्वतंत्र पूर्व भारतातील अनेक स्थित्यंतरे व चढउतार पाहिले होते. व  त्यावेळेसचे अनेक किस्से संबंधित नागरिकांना मोठ्या हौसेने त्या  सांगत होत्या. त्यांच्या जाण्याने मौजे माळेगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे 107 वर्ष आयुष्य जगणाऱ्या आजी, म्हणून गावामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. तरी कलावती किर्ते यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, परतुंडे अशा प्रकारचा भला मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी विविध पक्ष, संघटना व गावातील प्रतिष्ठित व्यक्तिनी उपस्थिती लावली होती.

Post a Comment