करमाळा शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र संगीबा मंदिराची जागृत देवस्थान म्हणुन ओळख आहे. या मंदिराचे निलज गावच्या हद्दीत व पोथरे ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली कामकाज चालते. स्वातंत्र्य मिळाल्यापासुन आजतागायत हे मंदिर जसेच्या-तशा अवस्थेत पहावयास मिळत आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वछता गृह नाही, मुतारीची सोय नाही, ग्रामपंचायत म्हणावे तसे लक्ष देत नाही. अशी खंत येथील वारकरी संप्रदाय मंडळी करत आहेत.
सध्या पवित्र श्रावण महिना चालू असून, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण, सात दिवसांचा सप्ताह चालू आहे. भक्त गण येतात-जातात, पण वाचन करणारे भक्त, यांना पिण्याचे पाणी, आंघोळीचे पाणी द्यावे. अशी मागणी हे भक्तगणांकडून मागणी केली जात आहे. परंतु या ठिकाणी स्वछता गृह नसणे, म्हणजे हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.ग्रामपंचायत पोथरे, निलज येथील संबंधित अधिकाऱ्यांना, तातडीचे आदेश देऊन परिस्थितीची पहाणी करण्यास सांगुन, आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचना देतो. आणि सदरील देवस्थानाजवळील काम मार्गी लावतो.मनोज राऊत (गटविकास अधिकारी, करमाळा)








Post a Comment