जनशक्ती शेतकरी संघटना ही जात-पात, धर्म, पंथ न माननारी संघटना असून, मानवता हाच धर्म मानुन समाजातील अठरापगड जातीच्या, धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी काम करणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून सत्तेवर ज्यांची मक्तेदारी आहे. त्यांची मक्तेदारी नष्ट करण्यासाठी गोरगरीब, कष्टकरी घरातील उमेदवारांना निवडणूकीमध्ये उभे करुन, त्यांना सत्तेवर बसविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. तालुक्यातील जनतेने आता पर्यंत आ.शिंदे, माजी आमदार पाटील, बागल यांना मते देवून मोठे केले. त्यांनी सत्तेचा उपयोग जनतेसाठी नव्हेतर स्वत:च्या कुटूंबासाठी केला. असा घणाघात करून जनशक्ती संघटना करमाळा तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सर्व जागा ताकदीनिशी लढणार असल्याचे प्रतिपादन अतुल खूपसे-पाटील यांनी केले. आज दि.३० जुलै रोजी सकाळी करमाळा येथील दत्त मंदिर येथे जनशक्ती संघटनेचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
यावेळी विचारमंचावर तात्या भोसले, नितीन जगताप, अतुल राऊत, दत्ता कोकने, दिपाली डीरे, शरद एकाड, वैभव मस्के, पांडू भोसले, बालाजी तरंगे, किशोर शिंदे, रामराजे डोलारे, अक्षय देवडकर, स्वाती जाधव, राणा वाघमारे उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त करुन, ही निवडणूक लढविण्याचा निर्धार बोलून दाखविला. त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून उभा करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी तालुक्यातील परंपरा प्रथेनुसार राजकीय गटाच्या नेत्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राणा महाराज वाघमारे यांनी केले. तर आभार शरद एकाड यांनी मानले. या मेळाव्यासाठी अमीर मुलानी, निखिल जगताप, कोमल खाटमोडे, कल्याण गवळी, नयन मस्के, हनुमंत कानतोडे, सुनील भोसले, प्रदीप ढवळे, गणेश ढोबळे, बापू मोहिते, साहेबराव इतकर, अजीज सय्यद यांच्यासह शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)







Post a Comment