केम ता. करमाळा येथे कायमस्वरूपी थांबणाऱ्या चेन्नई-मुंबई, हैदराबाद-मुंबई अप-डाउन या गाड्या कायमस्वरूपी थांबत होत्या. परंतु कोरोनाच्या काळामध्ये रेल्वे गाड्या बंद झाल्या. सध्या रेल्वे गाड्या सुरू झाल्यापासून दोन्ही गाड्यांचा थांबा बंद केला असून, याची चौकशी करून थांबा देण्यात यावा. अशी मागणी प्रवासी, विद्यार्थी, व्यापारवर्ग यांच्यातून होत आहे. पूर्वी या स्टेशनवर हैदराबाद-मुंबई, चेन्नई-मुंबई, साईनगर-पंढरपूर या गाडया थांबत होत्या. त्यामुळे कुर्डूवाडी, बार्शी, सोलापूरकडे जाणाऱ्या प्रवासी, विद्यार्थी, व्यापारीवर्ग यांना अप-डाऊन करणयाची सोय होत होती. तसेच हैदराबाद-मुंबई या गाडीमुळे पुणे, मुंबईकडे जाणारे प्रवासी, व्यापारीवर्ग यांना अप-डाऊन साठी सोय झाली होती.
पुण्यावरून काम करून प्रवासी केम येथे मुक्कामी येत होता. परंतु कोरोना रोग आला व त्यामुळे सर्व गाडया बंद झाल्या. या गाडया दिड वर्ष बंद होत्या, कोरोना संपल्यानंतर हळूहळू गाडया पूर्वपदावर आल्या. परंतु रेल्वे विभागाने चेन्नई-मुंबई मेल सुपरफास्ट करून केमचा थांबा रद्द केला. तर मुंबई-हैदराबाद हि गाडी कायम झाली असताना सुद्धा, याचा थांबा रद्द केला. यामुळे प्रवाशांचे व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. हैदराबाद मुंबई या गाडीला थांबा मिळवण्यासाठी, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सिराज मोमीन व ग्रामस्थ यांनी तब्बल बारा वर्षे म्हणजे एक तप घालवले. सन २०१२ साली सोलापूर रेल्वे विभागाचे रेल प्रबंधक म्हणून सुशील गायकवाड आले. त्यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सिराज मोमीन, जिल्हा परिषद माजी सभापती देविदास पोळके, संजय नवले, डाॅ. अंकुश तळेकर, श्रीमती सरोजनी नामदेवराव जगताप यांनी गायकवाड यांची भेट घेऊन, तब्बल बारा वर्षाचा रेल्वे थांबाचा पत्रव्यहार दाखवला व निवेदन दिले. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून, केम येथे हैदराबाद-मुंबई या गाडीला सहा महिन्याचा तात्पुरता थांबा दिला. व कलेक्शनची अट घातली. हि अट केम ग्रामस्थांनी पूर्ण केली. तब्बल सात लाख रूपये वर्गणी गोळा करून पुणे, मुंबईची तिकिटे फाडली. त्यानंतर एका वर्षानी हि गाडी कायम झाली. केम व परिसरातील आठ खेडयातील प्रवासी पुणे, मुंबईला प्रवास करू लागले त्यामुळे चांगली सोय झाली. या गाडीला उत्पन्न चांगले मिळायला लागले. परंतु कोरोना आल्यानंतर रेल्वे विभागाने कोणतीही सूचना न देता ह्या गाडीचा थांबा रद्द केला. तर चेन्नई-मुंबई या गाडीचा थांबा रद्द केला. सोलापूरला सकाळी जाणारी दुसरी कोणतेही रेल्वे सोडली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल गरिब पालक वर्गातून केला जात आहे. यासाठी केम गाव एकत्र झाले व "रेल्वे संघर्ष समिती" स्थापन केली आहे. या समितीच्या वतीने पुढे आंदोलने हि होणार आहेत. आता नियमाप्रमाणे निवदने देणे सुरू आहे. आता मात्र रेल्वे विषयी प्रवाशांच्या संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत.
केम-प्रतिनिधी (संजय जाधव)








Post a Comment