Header Ads Widget

 


मोडनिंब-प्रतिनिधी 

         द्वितीय राज्यस्तरीय कोशिकी मार्शल आर्ट चॅम्पियनशिप 2022 च्या दोन दिवशीय चॅम्पियनशिप स्पर्धा नागपूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून तेरा जिल्ह्यातील 320 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याने घवघवीत यश संपादन केले. सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी कुमारी श्रेयशी शिंदे- गोल्ड मेडल व कुमार यशदीप लोकरे- सिल्वर मेडल प्राप्त केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी जावेद शेख सर व प्रेसिडेंट किरण यादव सर यांनी सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व त्यांना पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय कोशिकी मार्शल आर्ट चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

           या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय पंच शंकर जाधव सर व पंच सयाजी राऊत सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातून पंच म्हणून संग्रामसिंह मोरे व आदित्य बिनगे यांनी काम पाहिले.






Post a Comment