Header Ads Widget

 



करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)

                  सावडी ता.करमाळा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) कामगार आघाडी, छत्रपती शाहू महाराज युवक प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने गावची सुकन्या नुतन PSI शितल ठेंबे हिचा व पती अनिल बोसरे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना गायकवाड म्हणाले कि, शितल ठेंबे हिने MPSC च्या परिक्षेत घवघवीत यश मिळवून, सावडी गावाच्या नाव लौकिकामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. हि गोष्ट सावडी आणि करमाळा तालुक्यासाठी अतिशय कौतुकास्पद आहे. अथक परिश्रम, जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करता येते. ह्याचे शितल ही एक ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी उत्तम प्रेरणादायी उदाहरण आहे.


               यावेळी उपस्थितांचे आभार मानताना, PSI शितल ठेंबे म्हणाली कि, आई-वडील व लग्नानंतर सासरच्या मंडळींनी विशेष सहकार्य केल्यामुळेच मी हे यश मिळवू शकले. माझ्या मनातील जिद्द आई-वडीलांप्रमाणेच, माझे पती व सासरच्या मंडळींनी ओळखली. व त्यामुळेच त्यांनी मला संसार सुखात लीन न करता, मला आभ्यास करायला जास्तीत जास्त वेळ दिल्यामुळेच माझी PSI होण्याची इच्छा पूर्ण करू शकले. अथक परिश्रम, जिद्द व चिकाटीच्या जोरावर कोणतेही यश मिळवता येते. परिस्थिती सगळ्यांचीच असते, परंतू परिस्थितीचे भांडवल न करता सतत केलेल्या प्रयत्नांमुळे यश निश्चित मिळते. असे सत्काराला उत्तर देताना शितल हिने तीचे मनोगत व्यक्त केले. 


               यावेळी PSI शितल ठेंबे हिचा सत्कार करताना, यशवंतभाऊ गायकवाड, पै.महादेवनाना शेलार, डॉ किरण गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मोहन देशमुख, नाना ठेंबे,अरूण रजपूत, दिनेश ठेंबे, सतिश जाधव, संदीप ठेंबे, वर्षाबापू मांढरे तर महिला गटाच्या वतीने शितल ठेंबे हिला औक्षण करताना सौ.गिता गायकवाड, सौ. शितल रजपूत, सौ. रेखा शेलार, सौ. वैजयंताबाई गायकवाड हे उपस्थित होते.


             २७-६-२२ रोजी शितल नानासाहेब ठेंबे हिला नाशिक येथे झालेल्या पोलिस अधिकारी प्रशिक्षण केंद्रात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी, मानाची रिव्हाल्वर, व उत्कृष्ट अभ्यास अशा तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.


Post a Comment