Header Ads Widget

 



केम-प्रतिनिधी (संजय जाधव) 

                  केम तालुका करमाळा येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थान आहे. या देवस्थानचा फार मोठा इतिहास आहे.  ह.भ,प. कविवर्य भास्कर साकतकर यांनी केम येथे येऊन या देवस्थानची माहिती घेऊन, त्यांनी श्री ऊत्तरेश्वर महात्म्य ग्रंथांमध्ये इतिहास लिहिला आहे. यामध्ये क्षेमराजाची सर्व कहाणी लिहिली आहे. याची माहिती भाविकांना व्हावी यासाठी श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट व ऊत्तरेश्वर रक्तदाते संघटना,  ग्रामस्थ यांच्या वतीने रविवार दि २६ जून ते ४ जुलै अखेर पर्यंत  रोज रात्री ८ ते १० या वेळेत श्री ऊत्तरेश्वर महात्म, ग्रंथाचे अर्थासहित वाचन होणार आहे. याचा केम व परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment