केम-प्रतिनिधी (संजय जाधव)
करमाळा तालुक्यातील शिवसेना महिला आघाडी एकसंधपणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. यासाठी शिवसेना महिला आघाडीची बैठक केम येथे आयोजित केली होती. सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. वर्षाताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वर्षाताई चव्हाण म्हणाल्या की, करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या आम्ही सर्व रणरागिणी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत आहोत. "गेले ते कावळे राहिले ते मावळे" आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक कुठेच जात नाही. आणि पक्षात बहाना पण सांगत नाही, कसली तक्रार नाही, पद असो अथवा नसो, शिवसैनिक म्हणून आम्ही भगव्याशी एकनिष्ठ आहोत. शिवसेनेत गद्दाराना स्थान नाही. बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे कि, "जर कोण आडवा आला तर त्याला तुडवून पुढे जायचे" तुमच्यावर प्रेम करणारे शिवसैनिक आहेत. आज जे काही महाराष्ट्रात वादळ आले आहे. त्याला सच्चा शिवसैनिक घाबरत नाही. असली वादळ पेलवून लावण्याची धमक शिवसैनिकात आहे.
अशा प्रकारचे प्रतिपादन चव्हाण यांनी मांडले. यावेळी केम शहरप्रमुख आशा मोरे, मंगळ कावळे, रोहिणी नागणे, राणी तळेकर, शाखा प्रमुख भाग्यश्री पवार, सरस्वती कुरडे, रेश्मा देवकर, अंजली लोंखडे, पुजा देवकर, मनिषा दौड, दिपाली तळेकर, युवा सेनेच्या गौरी मोरे, आदिजणी उपस्थित होत्या. या नंतर शिवसेना महिला आघाडीने जय भवानी-जय शिवाजी, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उध्दव ठाकरे साहेब आगे बडो, हम तुम्हारे साथ है!!! अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.


Post a Comment