करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वांगी नंबर 3 मध्ये एसएससी मार्च-2022 च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गणेश करे-पाटील अध्यक्ष यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था करमाळा हे उपस्थित होते. यांनी त्यांचे विचार व्यक्त करताना म्हणाले की, रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडामधील एक नंबरची संस्था असून, आता त्याचे विद्यापीठांमध्ये रूपांतर झाले आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. रयतच्या "कमवा आणि शिका" या स्वावलंबी शिक्षणामुळे अनेक थोर व्यक्ती उच्चपदावर पोहोचल्या आहेत. न्यू इंग्लिश स्कूल वांगी नंबर-3 मध्ये मला या गुणवंत ,यशवंत ,किर्तीवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपला ऋणी राहील असे गौरोवोद्गार काढले. आणि या शाळेसाठी संस्थेच्या वतीने नेहमी सहकार्य करीन असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अविनाश कांबळे सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव रोकडे (स्थानिक स्कूल कमिटी सदस्य) होते. दिनकर रोकडे (व्यवस्थापन समिती सदस्य), सोमनाथ रोकडे (पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष), रामचंद्र रोकडे ,संतोष पाटील ,बंडू सुतार तसेच ग्रामस्थ, पालक शिक्षक-पालक तसेच विद्यार्थी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसएससी मार्च 2022 च्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गोल्ड मेडल व प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक सेवक यांचे सहकार्य लाभले. यामध्ये एस. डी. मोटे, एस. बी. खूपसे ,व्ही.एस.सुरवसे ,व्ही. बी. होनपारखे ,डी. व्ही.पारखे, वारे मामा यांचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन अतुल खुपसे यांनी मानले.



Post a Comment