Header Ads Widget

 



 करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)

                   यंदा दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलींचा सन्मान प.महाराष्ट्र आर.पी.आय. चे उपाध्यक्ष नागेशदादा कांबळे यांच्या शुभहस्ते, सामाजिक क्षेत्रात अग्रभागी असलेल्या समविचारी कुमारी सबेरा इसाक पठाण हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ, लक्ष्मण अर्जुन भोसले, हाजी सादीकभाई काझी, दस्तगीर पठाण, अशरफ तांबोळी, जावेद मणेरी, भीमराव कांबळे, नंदू कांबळे, सुहास ओहोळ, दत्तात्रय बडेकर, नामदेव वाघमारे, अजय कांबळे, मंगेश संमिदर आदीजण यावेळेस या सत्कारासाठी उपस्थित होते.

               सामाजिक क्षेत्रात अग्रभागी असलेल्या समविचारी कार्यकर्तेनी इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण मुलींच्या कुंटूबामध्ये जाऊन सबेरा इसाक पठाण हिचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नागेशदादा कांबळे म्हणाले की, ज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात परिपूर्ण जीवनाचा आधार शिक्षण आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. व मुलींनी ही आपल्या पालकांचा विश्वास संपादन करून उच्च शिक्षण पुर्ण केले पाहिजे. कारण संसाराचा केंद्र बिंदू स्री आहे हीच अचुकता लक्षात आली पाहिजे असे ते यावेळी म्हणाले.

              सदर कार्यक्रमाचे आयोजन नागेशदादा मित्र मंडळ,  मुस्लिम विकास परिषद, रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्ट, मुस्लिम सा.आ.उन्नती अभियान, बहुजन विकास संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी बहुजन विकास संस्था करमाळा चे अध्यक्ष इसाक पठाण यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment