Header Ads Widget

 



करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)

                 करमाळा तालुक्यातील देवळाली गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व सद़्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव, कृषि जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२२-२३ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व कृषीदुत जाधव अमर, जाधव प्रसाद, भाकड सुयोग, पावणे प्रशांत, राठोड सचिन, पोटे शुभम यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व व आचरण सादर करुन दाखवत, योगाचे महत्व समजावून सांगितले. 


              यावेळी सरपंच आशिष गायकवाड, उपसरपंच सौ. आश्विनी शिंदे, ग्रामसेवक सौ. अनिता डोलारे, कृषी सहाय्यक महेश रांजून, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक महादेव यादव, शिक्षक रंगनाथ देशमाने, संजय मुंढे, सुनील फूंदे, शिक्षिका सौ. वर्षा जव्हेरी, सौ. धनश्री मिरगणे, सौ. शुभांगी शिंदे, सौ. लंका साळुंके तसेच प्रगतशील शेतकरी सुनील ढेरे, समाधान जगताप, महेश झोले, संजय गुंड, बापू गुंड आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Post a Comment