Header Ads Widget

 



केम-प्रतिनिधी (संजय जाधव)

                     केम येथील शिवसेना एकसंधपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत आहे. यासाठी शिवसेना कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शिवसैनिकांची निष्ठा हि सदैव भगव्याशी राहिलेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसेनेत अशी किती तरी वादळे आली, पण सच्चा शिवसैनिक याला दाद देत नाही. बाळासाहेबांनी घडवलेले शिवसैनिक कधीच गद्दारी करीत नाही. आमदार फुटले तरी शिवसैनिक मात्र कोठे हि जाणार नाही. त्यांची निष्ठा भगव्यावर आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर, युवा सेनेचे सागर तळेकर यांनी व्यक्त केले.


                चार दिवस झाले, महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, शिवसैनिकांची भुमिका समजण्यासाठी केम येथे शिवसेनेची बैठक आयोजित केली होती. सुरूवातीला पत्रकार संजय जाधव व ग्रामपंचायत सदस्य राहुल कोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


             या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राम तरकसे यांनी केले. या बैठकीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ वर्षाताई चव्हाण मॅडम, शहर प्रमुख आशा मोरे, शिवसेना शाखा प्रमुख सतीश खानट, प्रसिद्धी प्रमुख अविनाश तळेकर, शिवाजी मोळिक, रमेश तळेकर, महादेव पळसकर, अनिल तळेकर, पांडू गुटाळ, बाबा मोरे, मुकेश कळसाईत, शिवाजी मोरे, राजेंद्र टांगडे, दत्ता परिट, पत्रकार राहुल रामदासी आदि शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment