Header Ads Widget

 



उपळवटे-प्रतिनिधी (संदीप घोरपडे)

                           करमाळा शहरामध्ये उपविभागीय डाक अधिकारी करमाळा विभाग नागेश डुकरे यांचा निरोप समारंभ उत्साही वातावरणात पार पडला असून, उपविभागीय डाक अधिकारी नागेश डुकरे सर यांची करमाळा विभागातून पुणे विभागात बदली झाल्यामुळे, करमाळा शहरामध्ये त्यांचा निरोप समारंभ करमाळा पोस्ट ऑफिसच्या वतीने करण्यात आला असल्याची माहिती, उपळवटे गावचे पोस्टमन सुनील शेलार यांनी दिली आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील उपस्थित होते. नागेश डुकरे सर यांना निरोप देताना पोस्ट ऑफिस मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आले होते.


              यावेळी उपस्थित डाक कर्मचारी व कामगारांचे नेते शिवाजी तोंडले सर, रमेश शेलार, परमेश्वर भोगल, हरिभाऊ आगवणे, माऊली चिंचकर, अशोक मोकाशी, आडसुळ मॅडम, धनंजय शिरसकर, लोखंडे मास्तर, पालके मास्तर, राजू दौंड, पांडुरंग कोकीळ, देशपांडे काका, शहाजी घळके, मनोज कुमार शेटे, गणेश वाड, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, उपळवटे गावचे पोस्टमन सुनील शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment