करमाळा -प्रतिनिधी (प्रशांत भोसले)
कर्तृत्वान महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करून महिलांचे मानसिक खच्चीकरण करणारे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील समस्त महिला वर्गाची माफी मागावी. अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महिलांना आरक्षण देऊन सक्षम बनवण्याचे काम केले. यामुळे अनेक महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. संसदरत्न खा.सुप्रिया सुळे यांना उद्देशून जमत नसेल तर घरी जा, भांडी घासा. अशी भाषा वापरणारे भारतीय जनता पार्टीचे जबाबदार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
हे त्यांचं वक्तव्य एकदम चुकीचे व निंदनीय अशा प्रकारचे आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील कर्तृत्वान महिलांचा अपमान व मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील समस्त महिला वर्गाची माफी मागितली पाहिजे.



Post a Comment