केम-प्रतिनिधी (संजय जाधव)
करमाळा तालुक्यातील केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल जगदाळे यांचा मनमानी कारभार सुरू असून, त्यांच्या अशा वागण्यामुळे रूग्णांचे हाल होऊ लागले आहेत. तरी त्यांची त्वरीत बदली करावी अन्यथा, केम प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा जाणता राजा स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष समीर तळेकर, राजेंद्र तळेकर, बालाजी अवताडे, विष्णूपंत तळेकर यांनी दिला आहे. करमाळा तालुक्यातील केम हे सर्वात मोठे गाव आहे. या गावची लोकसंख्या सुमारे 15 हजारांच्या आसपास आहे. तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार उपकेंद्रे असून एकूण १९ गावे जोडली आहेत. परंतु येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल जगदाळे यांचा मनमानी कारभार सुरू आहे. ते कधीही दवाखान्यात येतात. व रूग्णाला व्यवस्थित वागणूक देत नाहीत. कोरोनाच्या काळामध्ये सुध्दा त्यांच्या विरुद्ध बऱ्याच तक्रारी होत्या. त्या स्थानिक पातळीवर मिटवल्या परंतु त्यांच्यात काही सुधारणा झाली नाही. ते रूग्णांचा फोन हि उचलत नाहीत.
आज सकाळी केम येथील लक्ष्मण गुरव हे आपल्या वडिलांना घेवून उपचारासाठी दवाखान्यात सकाळी ९ वा. गेले होते. त्यावेळेस डाॅक्टर नव्हते त्यांनी डाॅक्टराना फोन हि केला. मी वडिलांना घेऊन दवाखान्यात आलो आहे असे त्यांनी सांगितले. तरी डाॅक्टर लवकर आले नाहीत. ते १०.३० वा. दवाखान्यात आले. तो पर्यंत रूग्णाला थांबावे लागले या अगोदर हि लक्ष्मण गुरव यांना असा दोन ते तीन वेळा अनुभव आला असल्याचे गुरव यांनी सांगितले आहे. जर एखादा रूग्ण सिरियस असेल तर, रूग्णांचे काय होणार? असा सवाल गुरव यांनी व्यक्त केला आहे. रूग्णाला व्यवस्थित ते बोलत नाहीत, पेंशटला सलाईन लावत नाहीत. त्यांच्या मनमानी कारभाराला रूग्ण वैतागले आहेत. याची चौकशी करून यांची त्वरीत बदली करावी. अशी मागणी समीर तळेकर यांनी केली आहे.
याबाबत डॉ. विशाल जगदाळे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले कि, मी परिक्षेला गेलो होतो. परिक्षेहुन आल्यावर माझी तब्येत बिघडली होती. त्यामुळे मला गावाकडून येण्यास एक तास ऊशीर झाला. मला लक्ष्मण गुरव यांचा फोन आला होता. मी आल्यावर त्यांच्या वडिलांवर उपचार हि केले. या प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या मी एकटाच डॉक्टर असुन, सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ओपीडीची संख्या वाढत आहे. त्यामुळे माझ्यावर कामाचा ताण पडत आहे, मी दिव्यांग आहे. अशा परिस्थितीमध्ये सुध्दा, मी रात्रं-दिवस काम करीत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी वर्ग अपुरा आहे.
डॉ.विशाल जगदाळे (वैद्यकीय अधिकारी, केम)



Post a Comment