करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)
वाशिंबे ता. करमाळा येथील अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 11 वी (विज्ञान) शाखेत शिकणारी अशलेशा बागडे हिची छत्तीसगढ (रांची) येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या निवडीबद्दल अभिनव शिक्षण संकुलाचे अध्यक्ष आबासाहेब झोळ व संस्था सचिव महादेव झोळ सर, संस्था प्राचार्य रणजित कादगे सर, प्रा. पंकज शिंदे, प्रा. यशवंत पवार सर, प्रा.मंगेश साखरे, प्रा. उमेश सांगळे, प्रा.दामाजी शेळके यांनी तिचे अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
अशलेशा ही श्री राजेश्वर विद्यालय येथे शिक्षक म्हणुध कार्यरत असणाऱ्या बागडे सर यांची कन्या आहे. अशलेशा हिने शिक्षणाबरोबरच आपली कुस्तीची आवड जोपासलेली आहे. तिच्या या आवडीला प्रेरणा देण्याचे काम खर्या अर्थाने तिचे कुटुंब व शिक्षकांनी केले आहे.



Post a Comment