Header Ads Widget

 



करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)

                        राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती करमाळा शहरांमध्ये डीजे, डॉल्बी न लावता, करमाळा शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सुसज्ज स्मारक उभा करण्याचे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समितीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते ठरलेले आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशामध्ये तीस वर्ष आदर्श लोकाभिमुख कारभार करून, सर्व प्रजेला सुखी व समाधानी ठेवले. देशांमधल्या मंदिरांचे जिर्णोध्दार केले, नदीवरती घाट बांधले, दरोडे चोऱ्या करणाऱ्या दरोडेखोरांना राज्यातल्या जमिनी कसण्यासाठी दिल्या, व सैन्यामध्ये नोकरी दिली. अशा या राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या. जयंतीनिमित्त करमाळा शहरामध्ये प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे करमाळा शहरामध्ये सुसज्ज व मोठ्या प्रमाणात स्मारक उभारण्याची सर्वानुमते ठरलेले आहे.


                 या बैठकीला महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब सुपनवर, रिटेवाडीचे सरपंच दादासाहेब कोकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर, नाथाजी शिंदे, बाळासाहेब टकले, कैलास पवार, हिवरवाडीचे सरपंच बापू पवार, आजिनाथ इरकर, शेळके सर, अशोक गोफणे, सुशील नरूटे, उमरड गावचे सरपंच संदीप मारकड, जगन्नाथ सलगर, दादा महानवर, बापू पाटील, विवेक पाटील, बाळासाहेब बेरे, विनोद महानवर, दादा वायकुळे, भिवा वाघमोडे, बाळासाहेब कोळेकर आदी जन उपस्थित होते.

Post a Comment