करमाळा -प्रतिनिधी (प्रशांत भोसले)
करमाळा शहरातील मुख्य वाहतुक असलेला रस्ता म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कमलाभवानी देवीचा रोड, येथील नागरीकांच्या मागणीनुसार कामाला सुरुवात झाली आहे. परंतु बरेच दिवस नागरिकांनी व दुकानदार व्यापाऱ्यानी ह्या रस्त्याच्या धुळीचा त्रास सहन केला असुन, आता कुठे तरी रस्ता काम करण्यास सुरवात झालेला आहे. तरी ह्या रस्त्याचे काम नियमानुसार व उत्तम प्रकारचे व्हावे म्हणजे तो लवकर खराब होणार नाही. सध्या तरी करमाळा शहरातील रस्त्याच्या बाबतीत न बोललेच बरे अशी परिस्थिती आहे. तसेच खरं तरं प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असते कि, आपल्या परिसरातील कामे व्यवस्थित होतात का बघण्याची, लोक प्रतिनिधींना जाब विचारण्याची, परंतु आमचा करमाळकर या गोष्टींत खुप आळशी दिसुन येत आहे हे दुर्दैव!!!!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा महिला आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत कि, आई कमलाभवानीच्या रस्त्यावर तरी चांगले प्रकारे काम करून रस्ता व्हावा. येथे भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा होणार असून आहे, याची किमान आठवण ठेवावी.



Post a Comment