करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)
धनंजय डिकोळे यांनी पत्रकार परिषद सुरू असताना पत्रकारांशी अर्वाच्च भाषेत वर्तन केले आहे. तर दिग्विजय बागल यांनी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या जाहिर सभेत पत्रकारांचा भुरटे पत्रकार म्हणुन उल्लेख केला आहे. हे लोकशाहीला अशोभनीय असून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा हा अवमान आहे. समाज घडविणाऱ्या, समाजाला ताकत देणाऱ्या पत्रकारांवर असा अन्याय होत असेल तर जनशक्ती संघटना शांत बसणार नाही. येत्या दोन दिवसात या दोघांनी नाक घासून पत्रकारांची माफी मागावी. अन्यथा त्यांच्या घरासमोर त्यांचे पुतळे उलटे टांगून जनशक्ती संघटना तीव्र आंदोलन करेल.


Post a Comment