करमाळा-प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील अनेक गरीब लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास तसेच रमाई घरकुल योजनेतून ,ग्रामीण भागात जवळपास १२०० घरकुल मंजूर झालेले आहेत. परंतु बांधकाम साहित्याचे वाढते भाव पाहता घरकुलासाठी मिळणारा निधी हा तुटपुंजा होत आहे. कारण बांधकाम साहित्याचे भाव दुपटीने वाढले आहेत. त्यातच गवंडी कारागिरांची मजुरी यात पण वाढ झालेले आहे. वाळू सिमेंटचे भाव गगनाला भिडलेले आहेत.
त्यामुळे लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान न परवडणारे आहे. किमान गरीब लाभार्थ्यांना बांधकामासाठी लागणारी पाच ब्रास वाळू प्रत्येकी दिली, तर त्यांना तेवढाच दिलासा मिळेल. यासाठी कोळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व कोळगाव ग्रामपंचायतचे सदस्य अमित जागते यांनी करमाळा येथील तहसीलदारांना निवेदन देऊन गरजू लाभार्थ्यांना झिरो रॉयल्टीने किमान पाच ब्रास वाळू मिळावी. हे अर्जाद्वारे मागणी केलेले आहे.




Post a Comment