करमाळा-प्रतिनिधी (प्रविणकुमार अवचर)
मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल यांचे प्रयत्नातून व आ. संजयमामा शिंदे यांचे आमदार निधीतून दिनांक 27 मार्च रोजी मांगी येथील पंचशील बुद्धविहार व रेणुका माता मंदिर परिसरात 2 हायमॅक्स दिवे बसविण्यात आले. त्यानिमित्त पंचशील बुद्ध विहार कमिटीच्या वतीने सुजित बागल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुजित बागल यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले कि, आ. संजयमामा शिंदे यांची कामाची पद्धत ही सर्वांना परिचित आहे. गट तट न पाहता आमदार संजयमामा हे जनतेचे प्रश्न सोडवत असतात. कार्यकर्त्यांसह विरोधकांच्या अडीअडचणी असतील, त्या आमदार पुढे होऊन मार्गी लावतात. त्यामुळे आ. शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे स्वतःला सामाजिक कार्यात झोकुन देऊन, जनतेची अहोरात्र निस्वार्थी सेवा करण्याचं कार्य सुजित बागल हे करत आहेत. जास्तीत-जास्त विकास कामांवर भर देत मांगी, जातेगाव शिव रस्ता मुरूम, खडीकरणसाठी 10 लाख ,मांगी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धारसाठी 10 लाख ,मांगी, दक्षिण वडगाव मुरूम खडीकरणं 10 लाख ,मांगी शिवारात हनुमंत माळी वस्ती मुरमीकरणं 3 लाख, असा भरघोस निधी आमदार शिंदे यांचे मार्फत सुजित बागल यांनी मिळवुन देत, या विकास कामांची लवकरच सुरवात करण्यात येणार आहे.
आमदार संजयमामा शिंदे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून सुजित बागल यांची तालुक्यासह जिल्ह्यात ही ओळख आहे. शिंदे आमदार नसताना ही ,त्यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक गावा-गावात विकासकामे राबविण्याचे काम सुजित बागल यांनी केले आहे. गेली अनेक वर्षे मांगी येथील पंचशील बुद्ध विहार ,साठी हायमॅक्स बसवण्याची प्रलंबित असणारी मागणी बागल यांनी पूर्ण केल्याबद्दल, कमिटीचे सदस्य व घुमटवाडी येथील सुजित तात्या बागल मित्र परिवारातर्फे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कमिटी अध्यक्ष नवनाथ अवचर ,उपाध्यक्ष अजिनाथ चव्हाण ,सेक्रेटरी शहाजी अवचर, खजिनदार महेंद्र अवचर ,सदस्य रोहन अवचर ,प्रवीण अवचर ,शुभम अवचर, प्रेम चव्हाण ,हर्षल अवचर, संतोष चव्हाण ,ग्रामस्थ लालासाहेब बागल, तात्या कोळी , रामसे ,शाम पवार, शांतीलाल शिंदे, नितीन शिंदे ,मशीन भाईसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment