करमाळा-प्रतिनिधी
'पुस्तके केवळ मनोरंजन करीत नाहीत, ती माणसांचे भावविश्व ढवळून काढतात, अनोखे अनुभव देतात, वेदनेवर फुंकर घालतात, जाणिवांचा परिघ विस्तारतात, जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. पुस्तके मनावर साठलेले निराशेचे मळभ दूर करून मने प्रज्वलित करतात. असे मत यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले. पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोरवडचे 'महात्मा ज्योतीबा फुले विदयालयाचे मुख्याध्यापक नवनाथ मोहळकर सरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेची माहिती देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळेस दहावीच्या विद्यार्थ्यांनी देखील आपली मनोगते व्यक्त करून विद्यालयाच्या आठवणींना उजाळा दिला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापक कोळेकर सर यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बरडे सर यांनी केले. सदर कार्यकम यशस्वी करण्यासाठी विदयालयातील शिक्षक परदेशी सर, सरडे सर, रासकर ,सर श्रीमती लांडगे मॅडम यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment