Header Ads Widget

 



करमाळा-प्रतिनिधी (प्रविणकुमार अवचर)

          उन्हाळा सुरू झालेपासून सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. गेले काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट सुरू असून, गेले 2 दिवसात उष्माघातामुळे 4 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे शाळा प्रशासनाने सुधारीत आदेश काढत, प्राथमिक शाळांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 12,30 पर्यन्त ठेवलेली आहे. मात्र ग्रामीण भागात सकाळी 11 वाजले पासूनच तापमान 38 डिग्री पर्यन्त जात आहे. प्रचंड उष्णता वाढतेय, परंतु शाळा सुटण्याची वेळ ही दुपारी 12,30 असल्याने पहिली ते चौथीचे चिमुकले विद्यार्थ्यांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे.

             कित्येक विद्यार्थी हे वाड्या वस्त्यावरून पायी शाळेत येतात. शाळा सुटल्यानंतर घराकडे जाताना भयानक उन्हाचे चटके सहन करत चालत घरी जावे लागते. कित्येक विद्यार्थ्यांना पायात चपला नसतात. डोक्याला प्रचंड उन लागते. टोपी किंवा स्कार्प सुद्धा नसतात. अशात उष्माघाताचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून, शाळा प्रशासनाने किमान वाड्या वस्तीवरील मुलांची शाळा सकाळी 11 वाजता घरी सोडावी. जेणेकरून ते उन्हाच्या अगोदर आपल्या घरी सुखरूप पोहोचता येईल. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिला अवचर यांचेसह पालक वर्गातून होत आहे.

Post a Comment