आदिनाथ कारखान्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चाललेले नाटक म्हणजे ,.... पणाचे लक्षण ज्यांनी कधी सामाजिक कार्यच्या माध्यमातून लोकांची मने जिंकली नाहीत. शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची बाजू मांडून त्यांना कधी न्याय मिळवून दिला नाही. यातील चारही गटातील समर्थकांनी एकत्र येऊन बचाव समिती तयार केली,याच समितीला तालुक्यातील जनतेने चांगले ओळखुन खरा चेहरा उघडा पाडण्यासाठी विरोध चालू करत कामगार वर्ग बोलता झाला.
गेल्या तीन वर्षांपासून आदिनाथ कारखान्यातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे अनेक वेळा रस्त्यांवर उतरून आंदोलने, मोर्चे, उपोषण कामगारांना सोबत घेऊन कोणतंही राजकारण न करता व कोणाला विरोध न करता न्याय मिळवून देण्यासाठी लढत होते. कामगार सुध्दा पोटाला चिमटा घेऊन दशरथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने मुंबई, पुणे वर्षा बंगल्यावर जाऊन केली. त्यावेळीस आदिनाथ बचाव समिती कुठे गेली होती, मग आता ही समिती कोणाच्या परवानगीने स्थापन केली. 32 हजार सभासदांपैकी किती सभासदांनी सहमती दिली? जर सभासदांना विश्र्वासात घेऊन समिती स्थापन केली असती मग म्हणता आले असते, खरी बचाव समिती!!!! मग ही बनाव समिती कोणाच्या विचाराने तयार झाली. यांचा शोध सभासदांनी व कामगारांनी घेतला पाहिजे. ज्यावेळेस कामगारांना घेऊन शेतकरी कामगार संघर्ष समिती लढत होती. तेव्हा तालुका सोडून गेले होते का? मग आदिनाथ बचाव समिती स्थापन करून शेतकऱ्यांना व कामगारांना भुरळ पाडून येणाऱ्या निवडणुका जिंकण्याचा डाव समितीचा आहे हे उघडपणे दिसत आहे.
आतापर्यंत हीच मंडळी म्हणत होती कारखाना फक्त पवार कुटुंब चालवू शकते. मग आता अचानक यांना झाले तरी काय? भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले कि, आदिनाथ बचाव समितीला मी जाहीरपणे आवाहन करतो. आपण चालवलेले नाटक थांबवा आणि कामगारांचा व ऊस उत्पादन शेतकऱ्यांच्या भावनांशी न खेळता स्वार्थी राजकारण न करता तालुक्यातील ऊसाच्या क्षेत्राचा विचार करून, कारखाना चालविण्यासाठी जो कारखाना सहकार तत्वावर चालवेल.
त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य करा. मग बारामती अग्रो,बागल गट, शिंदे गट, पाटील गट किंवा शेतकरी कामगार संघर्ष समिती असो.... यापैकी कोणीही कारखाना चालविण्यासाठी तयार असतील. तर त्यांना येणाऱ्या निवडणुकीत एकहाती कारखाना ताब्यात देऊन आदिनाथ बचाव समितीने कोणते हि राजकारण न करता खंबीरपणे पाठीशी उभे राहून वाटेल ते सहकार्य करावे. मगच कारखाना बचाव समिती खरी आहे हे दाखवून द्यावे. असे प्रामाणिकपणे काम करता येत नसेल तर रोहित पवार यांच्या ताब्यात कारखाना देऊन, आदिनाथ बचाव समितीने लक्ष घालून पारदर्शकपणे कारखाना चालविण्यास मदत करावी.असे भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले....
करमाळा-प्रतिनिधी


Post a Comment