Header Ads Widget

 



 करमाळा-प्रतिनिधी 

             महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादीत पुणे या राज्यस्तरीय शिखर संस्थेवर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने  निर्विवाद वर्चस्व मिळविले. तब्बल ४ वर्षे प्रलंबीत असलेल्या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित राज्य बाजार समिती संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीची मतमोजणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साखर संकुल पुणे येथे पार पाडली. निवडणुक निर्णय अधिकारी तथा शहर जिल्हा उपनिबंधक एन .व्ही. आघाव यांनी संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया पार पाडत निकाल जाहीर केले. संचालक मंडळाच्या २१ जागापैकी माजी आमदार जयवंतराव जगताप (सोलापूर), प्रविणकुमार नाहाटा (अहमदनगर), अनंतराव देशमुख (रायगड), रमेश शिंदे (सातारा), अशोकराव डक (बीड), सेवकराम ताथोड (अकोला) व संजय कामनापुरे (वर्धा) हे सत्ताधारी पॅनेलचे ७ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडले होते.

         आज झालेल्या मतमोजणीत मनिष दळवी (सिंधुदुर्ग) व दामोदर नवपुते (औरंगाबाद) हे सर्वसाधारण मतदार संघातील उमेदवार समसमान मते मिळाल्यामुळे चिठ्ठी व्दारे तर पोपटराव सोनवणे (धुळे), अंकुश आहेर (हिंगोली), संतोष सोमवंशी (लातूर), ज्ञानेश्वर नागमोते (अमरावती), आनंदराव जगताप (यवतमाळ) केशवराव मानकर (गोंदीया), दिनेश चोखारे (चंद्रपूर) हे सर्वसाधारण मतदार संघातील उमेदवार तर महिला राखीव मधून रंजना कांडेलकर व इंदूताई गुळवे, अनुसूचित जाती - जमाती मधून बाबाराव पाटील, इतर मागासवर्गीय मधून संदीप काळे तर विमुक्त जाती / भटक्या जमातीतुन पंढरीनाथ थोरे असे १४ उमेदवार विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, बाजार समिती संघाचे विद्यमान सभापती आमदार दिलीप मोहिते - पाटील, आमदार संजयमामा शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment