Header Ads Widget

 



उपळवटे-प्रतिनिधी (संदीप घोरपडे)

            माढा तालुक्यातील कुर्डु येथील गोरे वस्ती जवळ गेल्या पावसाळ्यात सप्टेंबर महिन्यामध्ये विजेचा पोल मोडून पडला होता. याच्याकडे ना महावितरणचे ना ग्रामपंचायतचे लक्ष नसल्याने, सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून आता तरी गोरेवस्ती जवळील विजेचा पोल बसवून देऊन सहकार्य करावे. असे संबंधित नागरिकांची मागणी आहे. हा खांब कुर्डू ग्रामपंचायत हद्दीतील शेतकी फार्म समोरील गोरे वस्ती येथील असून, हा खांब सप्टेंबर महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये मोडला आहे. याबाबत ग्रामपंचायत कुर्डू, वीज महामंडळ तसेच तहसीलदार माढा यांना खांब बदलण्याबाबत निवेदनही दिले आहे. 
             परंतु गेली पाच ते सहा महिन्यापासून आज तागायत हा खांब बदललेला नाही. सदरचा खांब हा बाभळीच्या झाडाच्या फांदीमुळे खाली पडलेला नाही. थोडेही वारे सुटल्यास अथवा तारांवर पक्षी बसल्यास स्पार्किंग होऊन वारंवार फ्यूज जात आहे. तसेच हा खांब मोडल्यामुळे भविष्यात वादळी वाऱ्यात खाली पडण्याची शक्यता आहे. या खांबाच्या खालून लोकांची ये-जा चालू असते. त्यामुळे काही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा प्रशासनास (ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच वार्ड क्रमांक तीन मधील ग्रामपंचायत सदस्य, वायरमन) यांना विनंती केली आहे की, हा खांब लवकरात लवकर बदलावा. त्यामुळे भविष्यात होणारी दुर्घटना टळेल. आमच्या सहनशीलतेचा अंत ग्रामपंचायत व महावितरणने पाहु नये. जर भविष्यात कोणतीही जीवित हानी झाली तर याला ग्रामपंचायत व महावितरण जबाबदार राहील असेही प्राचार्य पोपट वाघमारे यांनी सांगितले आहे.
 

Post a Comment