
करमाळा प्रतिनिधी/आदिनाथ कारखाना चालविण्यास राजकारण करुन शेतकऱ्यांच्या चुलित आधी पाणी ओतून पुतनामावशीचे खोटे प्रेम असल्याचा आणणाऱ्या बचाव समितीच्या दुटप्पी धोरणाचा शेतकरी वर्गानी विचार करून यांच्या ढोंगीपणाचा बुरखा फाडून बचाव समितीला धडा शिकवला पाहिजे असे मत भिम दल सामाजिक संघटनचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांनी व्यक्त केले आहे. करमाळा तालुक्याचे राजकारण सध्या ऊसाभोवती फिरत आहे.बागलाचे राजकारण संपविण्यासाठी पाटील गटाने सुरुवातीला संचालक मंडळाला हाताशी धरून साखर विकु दिली नाही कारखाना अडचणीत आल्यावर आठ संचालकांनी विरोधी. भुमिका घेतली त्यामुळे कारखाना अडचणीत आला अशावेळी कर्ज काढण्यास अडचण आल्यावर मात्र कारखाना चालू होतं नाही यामध्ये राजकारणाचा भाग म्हणून कामगारांत अंसतोष वाढवण्याचे काम केले त्यामुळे कारखान्याचे कर्ज वाढत गेल्याने बागल गटांनी कारखाना पवारसाहेबाच्या बारामती ॲग्रोला चालु करण्यास दिला.राजकीय लोकांचे पितळ उघडे पडुन करमाळा तालुकावासियांची भुमिका स्पष्ठ झाल्याशिवाय कारखाना चालू करण्याची भूमिका घेतली नाही. शिंदेगटानीसुध्दा आदिनाथ आपण चालवण्याची भुमिका घेऊन शेतकरी वर्गाला खोटी अशा दाखवून आपले खाजगी कारखाने जोरदारपणे चालवले आहे. ऊसाचे राजकारण करुन मते मिळवणारे पुढारी मात्र यावेळी ऊसाचे उत्पादन क्षेत्र वाढल्यामुळे यात आपण बंद पाडलेला आदिनाथ आपल्या राजकारणाच्या मुळावर येत आहे हे लक्षात आल्यावर जागे झाले असून आपल्या गटातील बगलबच्चाना पाठिंबा देऊन आपणास जनतेचा कळवळा असल्याचे नाटक करीत आहे. ज्यांनी कारखाना बंद पाडला तेच शेतकरी हितासाठी आपण किती जागरूक आहोत असे दाखवून पवार साहेब व शेतकरी कामगार यांच्यात आपल्या बाबतीत सहानुभूती मिळवुन आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे ही आदिनाथ बचाव समिती म्हणजे पवारांचे अनुयायी असल्याचे आता स्पष्ट झाले असल्याचे भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांनी सांगितले आहे.
Post a Comment