Header Ads Widget

 



 करमाळा-प्रतिनिधी 

        राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने वांगी नं.4 शाळेचे मुख्याध्यापक भारत भानवसे यांचा सत्कार करण्यात आला. भानवसे यांना रोटरी क्लबचा जिल्हास्तरीय "राष्ट्र शिल्पकार पुरस्कार" मिळाला. म्हणून यांचा सत्कार शाळा व्यस्थापन अध्यक्ष यादव यांच्या हस्ते करण्यात आला. 

         यावेळी प्रमुख उपस्थिती शिक्षक भिसे सर होते. यांचा सत्कार विद्यार्थी आघाडी इंदापूरचे अध्यक्ष राहुल गडदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित शाळा व्यस्थापनाचे माजी अध्यक्ष सुनील सुळ, समाधान नलवडे, समाधान कोरे, राजेंद्र वाघमारे, रा. स. प. तालुका अध्यक्ष राज शहाजी शेटे-देशमुख आदीजन उपस्थित होते.

Post a Comment