श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना शिवसेना आयोजित करमाळा तालुका कार्यकारिणीची बैठक व पदाधिकाऱ्यांच्या निवडी, दिनांक 3 नोव्हेंबर मंगळवार रोजी सायंकाळी 7 वा. जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या संपर्क कार्यालय करमाळा येथे पार पडल्या. यावेळी तालुकाध्यक्ष पदी दादासाहेब तनपुरे, तालुका उपाध्यक्ष पदी राहुल शिंदे, मिलिंद भोसले, महिला तालुका अध्यक्ष पदी रेखाताई मुळूक, सचिव पदी सतीश कोल्हे, मिडिया प्रमुख पदी सूर्यकांत होनप, कोषाध्यक्ष पदी भाऊसाहेब भोसले व सदस्य पदी मजनू शेख, संतोष गोरे, नामदेव पालवे इ. पदाधिकाऱ्यांच्या निवडी सर्वानुमते तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला. उपस्थित नुतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी सदरच्या निवडी प्रसंगी ओबीसी व्हिजेएनटी सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश कर्चे, ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हाध्यक्ष पद्मजा इंगोले, युवासेना तालुका उपाध्यक्ष नवनाथ गुंड तसेच पत्रकार बांधवांसह इतर हि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Post a Comment