करमाळा तालुक्यातील खांबेवाडी (लांडगे वस्ती) येथील गट नं. 88 ची चुकीची नोंद झाल्यामुळे, या ठिकाणी राहणारी 20-25 दलित कुटूंबे बेघर होण्याच्या मार्गावर आहेत. सदरची करमाळा भूमिअभिलेख कार्यालयाकडून झालेली चूक त्वरीत दुरुस्त करावी. अन्यथा मंगळवार दि. 30 डिसेंबर रोजी करमाळा येथील भुमिअभिलेख कार्यालयावर भव्य निदर्शने हे आंदोलन करण्याचा, रिपाई (आ.) पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांनी पुणे येथील उपसंचालकांच्या भुमिअभिलेख कार्यालयाला दिलेल्या निवेदनातून इशारा दिला आहे.
सदरच्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, करमाळा तालुक्यातील मौजे खांबेवाडी या ठिकाणी ग.नं. ८८ मध्ये मातंग समाजाचे साधारणतः २५ ते ३० कुटूंब गेल्या ३० वर्षांपासून या ठिकाणी राहत आहेत. ही जमीन त्यांनी खरेदी केलेली आहे. खरेदी खतामध्ये दिशा बरोबर दिलेल्या आहेत. गट नं.८८ हा ज्ञानदेव नारायण लांडगे यांच्या नावे आहे. हा गट नं. चुकीच्या ठिकाणी नमुद केलेला आहे. भुमिअभिलेख कार्यालयाच्या चुकीमुळे मातंग समाजाचे कुटूंब हे बेघर होणार आहे. मा.न्यायालयाच्या ही चुक लक्षात न आल्यामुळे, सिव्हिल कोर्ट करमाळा, सेशन कोर्ट सोलापूर या ठिकाणी दलित समाजाच्या विरोधात निकाल गेलेला आहे. सध्या कोल्हापूर खंडपीठामध्ये केस सुरु आहे. जानेवारी महिन्यामध्ये कोर्टाची तारीख आहे. भूमिअभिलेख कार्यालयाने तात्काळ चूक दुरुस्त करुन न दिल्यास, कोल्हापूर खंडपीठामध्ये देखील केस विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास मातंग समाजावर फार मोठा अन्याय होईल.
भूमि अभिलेख कार्यालयामध्ये चुकीची नोंद झाल्यामुळे, दलित कुटुंबावर अन्याय होण्याची व मोठ्या प्रमाणात आर्थिक तसेच सामाजिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत संबंधित कार्यालयात वारंवार तोंडी व लेखी पाठपुरावा करुन देखील, अद्यापपर्यंत कोणती ही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे दलित कुटुंबाच्या हक्कावर गदा येत असून भविष्यात वाद, अतिक्रमण, किंवा कायदेशीर अइचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हि 'सर्व दलित कुटूंबे भूमिहिन आहेत. तरी मौजे खांबेवाडी येथील गट नंबर ८८ च्या भुमिलेखाची तात्काळ पाहणी करावी. प्रत्यक्ष स्थितीप्रमाणे चुकीच्या ठिकाणी झालेली नोंद दुरुस्त करुन, योग्य ठिकाणी नोंद करण्यात यावी. सदर प्रकरणात विलंब न करता तातडीने निर्णय घेऊन दलित कुटुंबावर होणारा अन्याय थांबवावा. आपण सदर तक्रारीची गंभीर दखल घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) च्या वतीने मंगळवार दि. 30/12/2025 रोजी दुः ठिक 12 वा. भूमि अभिलेख कार्यालय करमाळा, या ठिकाणी भव्य निदर्शने आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.
अशा प्रकारचे निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर, प्रांताधिकारी कुर्डूवाडी, तहसिलदार करमाळा, तालुका भूमि अभिलेख अधिकारी करमाळा, उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा यांना देखील देण्यात आल्या आहेत.






Post a Comment