पहलगाम काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ, व शहिद देशवासियांना श्रद्धांजली म्हणून दि. 28 एप्रिल 2025 रोजी यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदला मराठा सेवा संघ करमाळा व सकल मुस्लिम समाज करमाळा यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. यासंदर्भातील पाठिंब्याची निवेदने त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते यशपाल कांबळे यांच्याकडे सुपूर्द केलेली आलेत.
करमाळा बंद व दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली रॅली सोमवार दि. 28 एप्रिल 2025 सकाळी 9 वा. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व सुभाष चौक येथे उपस्थित सर्व समाज बांधवांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. तरी यासाठी करमाळा शहरातील सर्व घटकातील समाज बांधवांनी उपस्थित रहावे अशी विनंती यशपाल कांबळे यांनी केली आहे.


Post a Comment