करमाळा आगारात महाराष्ट्र शासनाने 5 नवीन एस.टी. बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आता करमाळाकरांचा प्रवास काही प्रमाणात सुखकारक होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून तालुक्यात जागोजागी एस.टी. बस बंद पडत होत्या. या सर्व बाबींचा विचार करुन तसेच प्रवाशांचा प्रवास सुखकारक व्हावा, यासाठी शिवसेना नेते दिग्विजय बागल यांनी 21 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देत, करमाळा आगारासाठी 15 नवीन बसेसची मागणी केली होती. व त्या अनुषंगाने त्याचा सातत्याने पाठपुरावा देखील केला होता. दिग्विजय बागल यांच्या निवेदनाचे फलित म्हणून करमाळा आगाराला 10 नवीन एस.टी. बस मंजूर करण्यात आल्या. त्यातील पहिल्या पाच नवीन एस.टी. बस करमाळा आगारात 21 मार्च रोजी दाखल झाल्या आहेत. तर पुढील 5 नवीन एस.टी. बस लवकरच उपलब्ध होणार असल्याचे दिग्विजय बागल यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
करमाळा आगारात आलेल्या पाच नवीन एस.टी. बसचे पूजन शिवसेना तसेच बागल गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मोठ्या जल्लोषात केले. यावेळी उपस्थित सर्वांना पेढे भरवत तसेच नवीन बसमधून काही अंतराचा फेरफटका देखील उपस्थितांनी मारला. या संपूर्ण कार्यक्रमासाठी दिग्विजय बागल यांची अनुपस्थिती जाणवून आली. यावेळी चिंतामणी जगताप (मा.उपसभापती करमाळा कृषी उ.बा.समिती), राहुल जगताप (मा.सभापती बांधकाम विभाग करमाळा न.पा.), सुनील बनसोडे (मा.नगरसेवक करमाळा न.पा.), जयकुमार कांबळे (मा.नगरसेवक करमाळा न.पा.), नितीन कांबळे, कुमार माने (युवक नेते), कृणाल कांबळे (युवक नेते), पंकज जाधव (करमाळा स्थानक प्रमुख), संतोष साने (वाहतूक नियंत्रक), जाधवर (वाहन परीक्षक), निर्मल कांबळे, रामभाऊ ढेरे, बबनराव इरकर, R.K.कांबळे इ.जण उपस्थित होते.




Post a Comment