दिनांक 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे यांचे लक्ष लागले असून, या निवडणुकी पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मात्र या अद्याप ही विभक्त आहे. मनसे कोणाला पाठिंबा देणार? याबाबत तरी सर्व काही गुलदस्त्यात आहे. तरी मनसे कोणत्या पक्षाला, गटाला साथ देणार? याबाबत देखील तर्क वितर्क लढविले जात आहेत. सदरच्या निवडणूकीच्या अनुषंगाने मनसे करमाळा नगरपालिका निवडणुकीत त्यांचा पॅनल उभा करेल. हि अपेक्षा मनसैनिक तसेच शहरवासियांना देखील होती. परंतू पक्षीय वरिष्ठ पातळीवरून काही घडामोडी घडल्यामुळे, या ठिकाणी मनसैनिकांना निवडणुकीत उतरता आले नाही. करमाळा शहरातील अनेक प्रश्नांना वाचा फोडणारा पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख झालेली आहे. यामध्ये लाईट, स्वच्छता, गटारी, पाणी, दिव्यांगांच्या मागण्या, वयोवृद्धांच्या मागण्या अशा विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्याचे काम मनसेने केलेले आहे. तरी करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप हे लवकरच निर्णय घेतील, अशा प्रकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संजय घोलप यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा यांच्या वतीने, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा मुद्दा पेटलेला असताना, घंटा गाडी वरील, हिंदी गाणे बदलून जनजागृतीपर मराठी गाणी वाजविण्याची मागणी केली. प्रशासनाने तात्काळ ती मागणी मान्य करून त्या गाण्यांमध्ये बदल केला. करमाळा तालुक्यामध्ये आमसभेचे गेल्या 13 वर्षांपासून आयोजन करण्यात आले नव्हते. या बाबतीत देखील घोलप यांनी मनसेच्या माध्यमातून आम सभेची मागणी लावून धरली. व त्याचेच फलित म्हणून करमाळा शहर तसेच तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या आवाजाला मोकळी वाट मिळाली.
करमाळा शहरातील अनेक प्रश्न प्रशासनासमोर मांडून तडीस नेण्याचे काम, मनसे पदाधिकाऱ्यानी गेल्या अनेक वर्षांपासून केले आहे. तरी नगरपालिकेच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये मनसे कोणता पवित्रा घेणार? कोणाला पाठिंबा देणार? हे अद्याप पर्यंत गुलदस्त्यात असून, त्यांच्या या निर्णयाकडे करमाळा शहरामध्ये मोठी चर्चा सुरु आहे.






Post a Comment