करमाळा नगरपालिका निवडणुकीत सध्या भाजपा, शिवसेना, करमाळा शहर विकास आघाडी व अपक्षांमध्ये लढत होणार असुन, या निवडणुकीत विविध पक्ष स्थानिक पुढारी यांच्यासोबत युती, आघाडी करत आहेत. आपापल्या पक्षाला बळकटी कशी मिळेल? याकडे सर्वांचा कल आहे. याच पार्श्वभूमीवर यशपाल कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कि, करमाळा शहरासाठी ज्या पक्षाकडे विकासात्मक दृष्टिकोन असेल. अशा पक्षाला आमचा पाठिंबा असणार आहे. कारण करमाळा शहर हे विकासाच्या दृष्टीने खुप पिछाडीवर आहे. प्रत्येकजण फक्त निवडणुकीत आश्वासने देतो. परंतू त्या आश्वासनांची पूर्तता देखील करावयाची असते. याचा मात्र जनतेने निवडून दिलेल्या उमेदवारांना पुर्णतः विसर पडतो. यानंतर या विसरभोळ्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी परत आम्हाला विविध प्रकारची आंदोलने करावी लागतात. त्यामुळे यावेळेस आम्ही आमचा पाठिंबा, जनतेच्या हितासाठी जो काम करेल त्यालाच देणार आहोत.
पुढे बोलताना कांबळे म्हणाले कि, करमाळा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आतापर्यंत सर्वच पक्षांनी आम्हाला संपर्क केलेला आहे. कोणत्या पक्षाला पाठिंबा जाहिर करायचा? याबाबतीत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत, चर्चा करुन पाठिंब्याचा निर्णय देखील लवकरच जाहिर करणार आहोत. तरी सध्या करमाळा नगरपालिका निवडणुकीत कोणत्या वेगळ्या घडामोडी घडतात. याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. शेवटी बोलताना कांबळे म्हणाले कि, सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला, नक्कीच या निवडणुकीच्या माध्यमातून करमाळा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाठविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. मग तो कोणत्या पक्षाचा आहे, हे न पाहता फक्त त्याची जनतेप्रती काम करण्याची तळमळ ध्यानात घेणार आहे. अशाप्रकारचे शेवटी यशपाल कांबळे यांनी सुचक वक्तव्य केले आहे.






Post a Comment