Header Ads Widget

 


करमाळा-
           पांडे जिल्हा परिषद गटात पांडे गण रायगाव गण, दोन्ही गण आरक्षित पडलेले आहेत, पांडे गणात एससी पुरुष, रायगाव गणात एस सी महिला या दोन्ही जागा आरक्षित आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही जागेवर तालुक्यातील प्रमुख गटाच्या नेत्यांनी, पक्षातील नेतेमंडळींनी भूमिपुत्रांचा विचार करावा. पार्सल उमेदवार न देता त्याच गणातील, गटातील उमेदवारांना संधी मिळावी. अशा प्रकारची प्रतिक्रिया पांडे जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार सुनिल भोसले यांनी दिली आहे.

              पुढे बोलताना भोसले म्हणाले कि, आतापर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून गेलेल्या सदस्यांना परत एकदा संधी मिळावी. अशी अपेक्षा न ठेवता प्रत्येक पक्षप्रमुख व गटप्रमुखांनी तरुणांना नव्याने संधी द्यावी. ज्यांनी सत्ता भोगलेली आहे अशांनी गटामध्ये कोणती कामे केली. या केलेल्या कामाचा खुलासा करून योग्य उमेदवार निवडून दिलेला होता का? याची खात्री करावी. आणि सामाजिक कार्य करणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांना पंचायत समिती स्तरावर काम करण्याची संधी द्यावी! असे पांडे गटातील सर्वसामान्य मतदारांचे मत आहे. यावर सर्व राजकीय नेत्यांनी विचार करावा. आणि ज्या पद्धतीने आपण मतदानाचा हक्क बजावून घेतो. त्याच पद्धतीने नवीन उमेदवाराना सुद्धा निवडणुका लढविण्याची संधी मिळावी. हे लक्षात घेऊन भूमिपुत्रांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये संधी द्यावी. अशा प्रकारचे सर्वच गटांना व पक्षातील प्रमुखांना सुनिल भोसले यांनी केले आहे.





Post a Comment