करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना मूलभूत सुविधांच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गटारींची दुरावस्था, स्वच्छतेचा अभाव, तसेच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई या सर्व जीवनावश्यक प्रश्नांवर अद्याप ठोस उपाय झालेले नाहीत. या सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, ब्ल्यू पँथर ग्रुप यांनी प्रभाग क्रमांक १ मध्ये आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ब्ल्यू पँथर ग्रुपच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक तसेच समाजोपयोगी कार्यक्रम सतत आयोजित केले जात आहेत. नागरिकांमध्ये एकोपा आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी विविध उपक्रम ही ग्रुपच्या माध्यमातून राबवले जातात.
ग्रुपचा उद्देश केवळ राजकारण करणे नसून जनतेचा खरा सेवक नगरपालिकेत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. जो नागरिकांचे प्रश्न समजून घेईल, त्यावर काम करेल आणि लोकांच्या हितासाठी सतत उपलब्ध राहील. आमचा उमेदवार हा “राजकारण करण्यासाठी” नव्हे तर “लोकांची सेवा करण्यासाठी” उभा राहत आहे. प्रभागातील सुमंतनगर, कुंभारवाडा, संभाजीनगर आणि मोहल्ला या भागात अनेक सुविधा अपुऱ्या आहेत. त्या सर्व क्षेत्रांचा सर्वांगीण विकास व्हावा. हीच ब्ल्यू पँथर ग्रुपची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही एखादा राजकारणी नव्हे, तर जनतेतीलच एक जनसेवक नगरपालिकेत पाठवण्याचा निर्धार केला आहे. अशा प्रकारची भुमिका बैठकीसाठी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली. तरी येणाऱ्या निवडणुकीत ब्लू पँथर ग्रुप खालील महत्वाच्या मुद्द्यांना घेऊन जनतेपर्यंत जाणार आहेत.
1) सर्व धर्म समभाव- एकतेचा धागा, विकासाचा मार्ग!
2) धर्म, जाती, पंथ यापलीकडे आम्ही फक्त जनतेच्या सेवेसाठी आहोत.
3) तुमचा विश्वास -आमची ताकद!
4) युवा लढणार- परिवर्तन घडणार
5) चला एकत्र येऊया आणि काम करणारा चेहरा निवडूया!
6) ब्ल्यू पँथर - जनतेचा विश्वास, विकासाचा मार्ग!
7) जनतेला एक काम करणारा चेहरा देत आहोत!
आमचे ध्येय....
1) नागरिकांच्या प्रत्येक समस्येचे समाधान
2) स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक शहर
3) लोकशाहीतील प्रत्येक आवाजाला न्याय
4) नगर विकासासाठी तुमच्या सहकार्याने, एक नवी दिशा!
अशा जनतेच्या हिताचे आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे घेऊन निवडणुकीत आम्ही जनतेपर्यंत जाऊन, जनतेची सेवा करणारा एक जनसेवक आम्ही जनतेला देत आहोत. हा विश्वास आम्ही जनतेला मिळवून देणार आहोत. अशा प्रकारची माहिती ब्लू पँथर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आशुतोष शेलार यांनी दिली. तसेच सदरच्या महत्वपूर्ण बैठकीसाठी बादल बडेकर, शंभू आहेर, सोहेल दारूवाले, अरबाज पठाण, तुषार बडेकर, संदेश कांबळे, रणजीत जाधव, सनी ताकतोडे, प्रशांत राजपुरे, संतोष कांबळे, अनिकेत नाळे, अलीम शेख, आकाश धनवे, दीक्षांत लोंढे, सुमित साखरे, हेमंत भागवत, राज शेख, आकाश दामोदरे, जीत भागवत, कोहिनूर ताकतोडे, गुरु गायकवाड, मंगेश ओहोळ, अभिजीत सूर्यवंशी, निहाल बडेकर, आकाश कुंभार, संतोष भोसले, अमोल सुरवसे, सिद्धार्थ सरवदे, बंटी आव्हाड, आर्यन शेख, आवेज मोगल, रोहन ओहोळ, आशिष पठाण, दिनेश जांभळे, नागेश कांबळे, साहिल पठाण, सलीम सय्यद, अजहर मुलानी, मुन्ना बडेकर, बबलू ठोसर, यश भागवत, तुषार साखरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






Post a Comment