पांडे जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण सुटले आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सौ. शितल क्षीरसागर यांनी, या गटातून मा.आ. संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, पांडे गटातून आपण स्वतः निवडणुकीसाठी इच्छुक असुन, मा.आ. संजयमामा शिंदे यांनी जर मला संधी दिली! तर आपण या गटातून निवडणुक लढवून भरघोस मतांनी निवडून देखील येऊ. असा विश्वास सौ. क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
पुढे बोलताना सौ. क्षीरसागर म्हणाल्या कि, सध्या मी पांडे ग्रुप ग्रामपंचायतीची विद्यमान सदस्य आहे. गेल्या 2 ते 3 वर्ष राष्ट्रवादी युवती करमाळा तालुकाध्यक्ष या पदावर काम करत असताना, युवतींच्या तसेच महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन, रस्त्यावरील देखील आंदोलने केली आहेत. त्याचप्रमाणे पांडे गटामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्वच गावांमध्ये मोठा जनसंपर्क आहे. याचा देखील मा.आ. संजयमामा शिंदे यांच्या गटाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, मा. आ. संजयमामा शिंदे यांनी पांडे गटातून निवडणुक लढविण्यासाठी आपल्याला संधी द्यावी. अशा प्रकारची मागणी मा.आ. शिंदे यांच्याकडे सौ. शितल क्षीरसागर ह्या करणार असल्याचे सांगितले आहे.






Post a Comment