करमाळा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी राजकुमार दोशी यांनी व्यवसायाच्या माध्यमातून उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यामुळे यशकल्याणी सामाजिक संस्थेच्या वतीने यावर्षीचा यशकल्याणी करमाळा उद्योग भूषण पुरस्कार राजकुमार दोशी यांना सहकुटुंब प्रदान करण्यात आला. यावेळी राजकुमार दोशी यांच्या पत्नी, दोन मुले, दोन्ही सुना व नातवंडे यांच्या सोबत त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. करमाळा येथील यशकल्याणी संस्थेचे प्रेरणास्थान श्रध्देय वसंतराव दिवेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रतीवर्षी वसंत महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येते. यामध्ये ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांना गौरविण्यात करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे यांनी केले, तर आभार प्रा. कल्याणराव साळुंके यांनी मानले. राजकुमार दोशी यांना उद्योगरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल, सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.





Post a Comment