इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त, आज पांडे येथील वृद्धाश्रमामध्ये मुस्लिम समाजातर्फे वृद्धांना चादरीचे वाटप करण्यात आले. पैगंबर जयंतीचे औचित्य साधून करमाळा येथील मुस्लिम समाज, तसेच हाजी हाशमुद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज पांडे, तालुका करमाळा येथील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये वृद्ध आजी-आजोबांना मोफत चादर व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. वृद्धांना थंडीपासून संरक्षण मिळावे या दृष्टिकोनातून, आज करमाळा शहर व तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने चादरीचेचे वाटप करण्यात आले. सदरचा चादरी वाटपाचा कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आमिरशेठ तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोहित पवार फाउंडेशनचे अध्यक्ष मुस्तकीम पठाण, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अश्फाक जमादार हे उपस्थित होते. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाचे संस्थापक बाळासाहेब गोरे गुरुजी यांनी आपले विचार मांडले. याशिवाय पैगंबर जयंतीनिमित्त कमलादेवी मंदिर येथील मूकबधिर अपंग शाळेत अपंग विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अरबाज बेग, असीम बेग, शाहरुख शेख, पैलवान आमीन बेग, तौफिक शेख, नदीम शेख, समीर शेख, समीर उर्फ गंमड शेख, जिशान शेख, अमन शेख, नवाज शेख, उजेफ शेख, अजहर जमादार, साहिल शेख, मतीन बागवान, शाबीर शेख, सद्दाम शेख, सोहेल शे तसेच प्रवीण आहेर आदि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.






Post a Comment