करमाळा फोटोग्राफर असोसिएशन तर्फे पदनिवड प्रक्रिया पार पडली, या प्रक्रियेत असोसिएशनचे नवीन पदाधिकारी सर्वानुमते निवडण्यात आले असून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व खजिनदार या पदांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सर्वानुमते अध्यक्षपदी बापु पवार यांची निवड करण्यात आली. त्यांनी आजवर छायाचित्रकार क्षेत्रात केलेले कार्य, समाजातले योगदान आणि 'सर्व सहकाऱ्यांमध्ये असलेला 'आदर या पार्श्वभूमीवर त्यांना सर्वाचा पाठिंबा लाभला. उपाध्यक्षपदी योगेश ठोंबरे यांची निवड झाली असून, संघटनेच्या विविध कार्यक्रमांत त्यांनी घेतलेला 'उत्स्फूर्त सहभाग आणि सहकाऱ्यांना एकत्र आणण्याची क्षमता, याचा लाभ भविष्यात असोसिएशनला होणार आहे. सचिव पदाची धुरा अनिकेत राऊत यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांनी संघटनेचे कामकाज सुव्यवस्थित ठेवण्यासह नवीन पिढीच्या छायाचित्रकारांना प्रेरणा देण्याचे काम करण्याचे आश्वासन दिले आहे. तर खजिनदार पदी राज मुसळे यांची निवड करण्यात आली असून, संघटनेच्या आर्थिंक बाबी पारदर्शक पद्धतीने हाताळण्याची जबाबदारी त्यांनी स्विकारली आहे.
यावेळी निवड प्रक्रियेसाठी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ सदस्यांनी नव्या पदाधिकायांचे अभिनंदन करत, एकत्रितपणे काम करून असोसिएशनचे नाव आणखी उंचावण्याचे आवाहन केले. या पदनिवडीमुळे करमाळा तालुक्यातील छायाचित्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. असोसिएशनच्या माध्यमातून छायाचित्रकारांच्या अडचणी सोडविणे, विविध प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे. तसेच समाजहिताचे उपक्रम राबविण्याचे उद्दिष्ट नव्या कार्यकारिणीने " पुढे ठेवले आहे. करमाळा फोटोग्राफर असोसिएशनची नवी कार्यकारिणी कार्यरत होताच, स्थानिक छायाचित्रकारांच्या प्रश्नांना अधिक जोमाने आवाज 'मिळणार असून एकजुटीने संघटना आणखी मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.






Post a Comment