करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध असा मांगी तलाव यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्येच ओहोरफलो झालेला आहे. मांगी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे, तलावाच्या सांडव्यातून पाणी प्रवाहित होण्यास सुरुवात झाली आहे. मांगी तलाव भरल्यानंतर दिसणारे विलोभनीय दृश्य व सांडव्यातून खळखळत वाहणारे पाण्याचे दृश्य, हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी करमाळा तालुक्यासह आजूबाजूंच्या तालुक्यांमधील अनेक पर्यटक, निसर्गप्रेमी हे मांगी तलाव व परिसराला भेट देतात. परंतु मांगी तलाव परिसरात पोहोचण्यासाठी निसर्गप्रेमी पर्यटकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. कारण मांगी तलावाकडे येणारे डाव्या व उजव्या कॅनल पट्टीवर प्रचंड प्रमाणात काटेरी झुडपे उगवलेली आहेत. त्यामुळे चार चाकी, दुचाकी वाहन घेऊन येणाऱ्या निसर्गप्रेमींना तलावाकडे येताना प्रचंड कसरत करावी लागत आहे.
त्याचप्रमाणे तलावावरती जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्यांच्या आजूबाजूला प्रचंड काटेरी झुडपे उगवलेली असल्यामुळे, अबाल वृद्धांना तलावावरती पोहोचताना प्रचंड त्रास होत आहे. लोणावळा खंडाळ्यापेक्षा ही मांगी तलावावरील मावळत्या सूर्याचे (सन सेट) हे दृश्य अत्यंत सुंदर व विलोभिनीय दिसते. परंतु निसर्गाचे सौंदर्य लाभलेल्या मांगी तलावाच्या सौंदर्यात काटेरी झुडपांची मोठी अडचण ठरत आहे. तरी पाटबंधारे विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन मांगी तलाव परिसराची स्वच्छता करावी. त्याचप्रमाणे मांगी तलावाकडे पोहोचण्यासाठी कॅनल पट्टीच्या रस्त्याची ही दुरुस्ती करावी. जेणेकरून पर्यटकांना, निसर्गप्रेमींना तलावापर्यंत पोहोचताना कोणती ही अडचण येणार नाही. अशी मागणी मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रवीण अवचर यांचेसह निसर्गप्रेमी करत आहेत.
निसर्गाचे वरदान लाभलेला मांगी तलाव शंभर टक्के भरलेला आहे. ओव्हरफ्लो झालेले पाणी सांडव्याबाहेर पडलेले आहे. हे विलोभनी दृश्य पाहण्यासाठी बरेचसे पर्यटक मांगी तलावाला भेट देत आहेत. परंतु तलाव परिसराची दुरावस्था ही अतिशय दयनीय आहे. मांगी तलाव परिसर मोठमोठे काटेरी झुडपांनी वेढलेला असून, तलावाकडे येणाऱ्या कॅनलपट्टीवरती ही प्रचंड प्रमाणात काटेरी झुडपे उगवलेली आहेत. तरी यासंदर्भात माहिती घेऊन मी पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केलेला आहे. मांगी तलावाच्या देखरेखीत बाबत त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आलेला आहे .व लवकरात-लवकर तलाव परिसरातील स्वच्छता करून घेऊ असे आश्वासन दिलेले आहे.
सुजित बागल- सदस्य, मांगी ग्रामपंचायत






Post a Comment