करमाळा शहरातील सहकार युवक मित्र मंडळ (ट्रस्ट) तेली गल्ली, या मंडळांनी गणेशोत्सवा दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन करमाळा उपविभागीय अधिकारी अंजना क्रिष्णा मॅडम यांनी दीप प्रज्वलन करून केले. कार्यक्रमाची सुरवात श्री गणेशाच्या पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमाप्रसंगी DYSP मॅडम अंजना क्रिष्णा यांनी मनोगत व्यक्त करत असताना म्हणाल्या की, सहकार युवक मित्र मंडळाने घेतलेले रक्तदान शिबिर उल्लेखनीय आहे. प्रत्येक मंडळाने या प्रकारचे सामाजिक कार्यात उतरावे. तसेच कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे विठाई मल्टीस्पेशालिस्ट डॉ. अजयकुमार तोरड यांनी त्यांच्या मनोगतात म्हटले की, गणेशोत्सव अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम करूनच साजरा केला पाहिजे. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम करणाऱ्यांसाठी, कोणत्या ही वैद्यकीय प्रकारची मदत लागली. तर मी 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर शहरातील सामाजिक कार्यकर्ते वर्धमान खाटेर यांनी रक्तदान केले.
यावेळी प्रतिष्ठित व्यापारी राजुशेठ शियाळ, सुशील कात्रेला, प्रकाश यादव, दिलीप क्षीरसागर, बंडू मुसळे, धीरज सोळंकी, जितेंद्र क्षीरसागर ,तुकाराम देशमाने, विकास पवार, सुनील अंधारे, दिनेश देशमाने, सचिन फलके तसेच मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.







Post a Comment