स्व. विठ्ठलराव चंद्रभान गोयेकर सोशल फाउंडेशन यांचे वतीने स्व. विठ्ठलराव गोयेकर यांच्या 13 व्या स्मृतिदिनानिमित्त, प्रतिवर्षी प्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगर वस्ती, येथील शाळेत फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर गायनाचार्य ह.भ.प. माऊली महाराज मस्के श्रीगोंदा यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना साथ गायनाचार्य हभप भाऊसाहेब पालवे महाराज देमणवाडी व मृदूंगाचार्य सौरभ महाराज खामगळ लिंबे यांनी दिली. तद्नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. व गावातील 60 लोकांना पंढरपूर येथे विठ्ठल-रूक्मीणी दर्शनास रवाना करण्यात आले. उपस्थित सर्व ग्रामस्थांना विठ्ठल-रूक्मीणी प्रतिमांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी मकाई सहकारी साखर कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय बागल, सरपंच संदीप शेळके, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, कंदरचे सरपंच भांगे मालक, राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट) तालूका अध्यक्ष संतोष वारे, युवक अध्यक्ष माजी सरपंच विलास बरडे, माजी पंचायत समित सदस्य विलास मुळे, माजी सरपंच दादासाहेब जाधव, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोवर्धन करगळ, ग्रामपंचायत सदस्य सुभाष पवार, पै.दादासाहेब पवार, अनिल पवार, समता परिषद तालूका अध्यक्ष प्रशांत शिंदे, सेक्रेटरी हनूमंत करगळ, प्रगतशील बागायतदार नानासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते भास्कर पवार, विविध क्षेत्रातील उद्योजक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वर्गीय विठ्ठलराव चंद्रभान गोयेकर सोशल फाउंडेशनच्या वतीने, गेली तेरा वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, यापुढे ही गावाला केंद्रबिंदू मानून स्व. विठ्ठलराव चंद्रमान गोयेकर सोशल फाउंडेशनच्या वतीने गावात सामाजिक उपक्रम राबविले जातील. असे फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील गोयेकर यांनी सांगितले.






Post a Comment