Header Ads Widget

 


करमाळा-
       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आदिनाथ कारखान्याचे माजी प्रशासकीय संचालक संजय गुटाळ यांनी, करमाळा येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी संजय गुटाळ यांच्यासह आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वीय सहाय्यक गणेश जगताप, समाधान चव्हाण, परमेश्वर सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. गुटाळ यांनी याप्रसंगी बोलताना म्हणाले कि, मुख्यमंत्री फडणवीस हे राज्याला मिळालेले एक कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान ठेवून, हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतल्याचे हि त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे भविष्यात ही आश्रमशाळेस सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरकुमार शिंदे सर यांनी केले. तर मुख्याध्यापक अशोक सांगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी शिक्षक भास्कर वाळुंजकर, विलास कलाल, विठ्ठल जाधव, विद्या पाटील, कुमार पाटील, प्रल्हाद राऊत, अधीक्षक बाळासाहेब शिंदे तसेच इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment