Header Ads Widget

 


करमाळा-
            श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचे औचित्य साधून शहरातील फंड गल्ली येथील, श्री स्वामी समर्थ मंदिरात दि. २८/०७/२०२५ रोजी विनामूल्य १०८ कुंडी रूद्रयागाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, श्री स्वामी समर्थ समाज सेवा मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. श्री सर्वज्ञेश्वर स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा विधी पार पडणार आहे.

        सोमवार दि.२८/०७/२०२५ रोजी सकाळी सात वाजता भुपाळी आरतीने या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, साडेसात वाजता स्वामी महाराजांना षोडशोपचार अभिषेक करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी ९ वाजता रुद्र यागाला सुरुवात होणार आहे. रुद्र यागानंतर दुपारी बारा वाजता आरती आणि महाप्रसाद झाल्यानंतर, दुपारी दोन वाजता भाविकांसाठी प्रश्नोत्तरे सेवा घेण्यात येणार आहे.

        श्री स्वामी समर्थ मंदिर (श्री गुरुपादुका मठ) येथे १०८ जोडप्यांच्या सहभागातून पार पडणाऱ्या या सेवेत सहभागी होण्यासाठी, ८८८८१५०९७५ किंवा ९९२२०२२३२६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Post a Comment