Header Ads Widget

 


करमाळा-
       करमाळा नगरपालिकेने गेल्या एक ते दीड महिन्यांपूर्वी शहरामधील फिरस्ती जनावरांवर योग्य व कडक कारवाई करत त्यांना कोंडवाड्यात टाकले होते. सदरच्या फिरस्ती जनावरांचे जर कोणी मालक असतील? तर त्यांनी करमाळा नगरपालिकेची दंडाची रक्कम भरून सदरची जनावरे घेऊन जावेत. परत शहरामध्ये उघडपणे फिरू देऊ नये. व नागरिकांच्या जीवितास धोका होऊ नये याची काळजी घ्यावी. अशा प्रकारचे ही अधिकाऱ्यांकडून तोंडी सांगण्यात येत होते. करमाळा नगरपालिकेने तयार केलेल्या कोंडवड्या मधील जनावरांना चारापाणी, कोंडवड्याची स्वच्छता व त्यांच्या आरोग्याची वेळीच तपासणी करणे गरजेचे असताना, या ठिकाणी करमाळा नगरपालिकेकडून कोणते ही नियोजन दिसून आले नाही. त्यामुळे या कोंडवड्यामध्ये बंदिस्त असणाऱ्या अंदाजे तीन जनावरांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. यामधील एका जनावराचा मृत्यू हा जनावरांच्या झुंजीमध्ये झाला असल्याचे, करमाळा नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक पुजारी साहेब यांनी सांगितले. तर उर्वरित दोन जनावरांचा मृत्यू हा कशामुळे झाला? हे अध्याप पर्यंत समजू शकले नाही. सदरची मृत पावलेली जनावरे, कोंडवड्या मधून जेसीबी मध्ये भरून रोशेवाडी येथील करमाळा नगरपालिकेच्या डंम्पिंग ग्राउंड च्या जागेमध्ये पुरले असल्याचे ही प्राथमिक माहिती मिळत आहे. तरी सदरच्या मृत पावलेल्या जनावरांविषयी नगरपालिकेकडून अद्याप पर्यंत कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. 

          सध्या सरकार गो संरक्षणाच्या दृष्टीने वेगवेगळी पावले उचलत असताना, करमाळा नगरपालिकेच्या कोंडवड्यामध्ये अशा प्रकारे तीन जनावरांचा दुर्दैवी मृत्यू होणे कितपत योग्य आहे? हे सुद्धा आता पाहणे गरजेचे आहे. अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये, जसे की चारा पाण्याची सोय नसणे, अपुरी जागा असणे, कमी जागेत मोठ्या प्रमाणात जनावरांची भरती करणे या कारणास्तव गुन्हा दाखल केला जातो. आता करमाळा नगरपालिकेच्या कोंडवड्यामध्येच अशा प्रकारे जनावरांचा मृत्यू झालेला असताना, फक्त जनावरांच्या झुंजीच्या नावाखालीच हा सर्व प्रकार दाबला जाऊ नये. यामध्ये जनावरांच्या योग्य चारा पाण्याची सोय केली होती का नाही? जनावरे ज्या ठिकाणी बंदिस्त केली होती त्या ठिकाणची स्वच्छता ठेवली जात होती का नाही? जेवढ्या जनावरांना कोंडवड्यामध्ये बंदिस्त करण्यात आले होते. त्या जनावरांना पुरेशी जागा होती का नाही? या सर्व बाबी आता तपासणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अवैध वाहतूक करणाऱ्या व जनावरांची हेळसांड करणाऱ्यांवर ज्याप्रमाणे गुन्हा दाखल केला जातो. त्याप्रमाणेच करमाळा नगरपालिकेच्या कोंडवड्यात झालेल्या जनावरांच्या मृत्यू बाबत प्रशासन किती सतर्कतेने निर्णय घेते. हे पाहणे सुद्धा आता गरजेचे आहे.

         करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे साहेब यांना सदरच्या जनावरांच्या मृत्यूबाबत दोन दिवसांपुर्वी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, माझ्या आरोग्याच्या समस्येमुळे सध्या मी रजेवर आहे याबाबतीत मला कोणती ही कल्पना नाही. या सर्व घटनेबाबत चौकशी करून माहिती घेतो. अशा प्रकारे तपसे साहेबांनी सांगितले आहे.

       साधारणतः बैलासाठी अडीच बाय अडीच मीटर जागा लागते. गोमातेसाठी दोन बाय दोन चौरस मीटर तर वासरासाठी एक बाय एक मीटर जागा लागते. त्याचप्रमाणे संबंधित मृत झालेल्या जनावरांबाबत करमाळा नगरपालिकेने आमच्याशी कोणता ही संपर्क केलेला नाही. जनावरे ही मृत होतच असतात, परंतु सदरच्या जनावरांच्या मालकांना जर जनावरांचा मृत्यू कशामुळे झालेला आहे? याबाबतीत माहिती हवी असल्यास आम्ही संबंधित जनावराचा शव विच्छेदन सुद्धा करतो.

डाॅ. प्रसाद धुमाळ, पशुधन विकास अधिकारी करमाळा



Post a Comment