महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मिरजगांव संचलित सद् गुरु कृषि महाविद्यालय मिरजगाव च्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी (कृषिदूत), ग्रामीण कृषि जागरूकता व औद्योगिक कार्यक्रम अंतर्गत करमाळा तालुक्यातील साडे गावामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्याच सोबत त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा साडे, येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक वसंत बदर सर, तसेच चिंचकर सर, दुधे सर, काशिद सर व विद्यार्थी उपस्थित असून कृषिदूत करे आदेश, दळवी प्रशांत, कांबळे स्वप्निल, भापकर उत्कर्ष, कलाल नागेश, खराडे रोहित, काळे किरण यांचा समावेश होता.
यावेळी कृषीदुतांनी उपस्थित असणाऱ्या चिमुकल्या ना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाला मार्गदर्शन करणारे महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. शंकरराव नेवसे, अध्यक्षा कल्याणीताई नेवसे, सचिव राजेंद्र गोरे, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे, प्राचार्य डॉ. रामदास बिटे, कार्यक्रम समन्वयक प्रा.चांगदेव माने, कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन आढाव, प्रा. महेश कुतवळ आदिजण उपस्थित होते.





Post a Comment