करमाळा-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल मुंबई येथे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी भेट घेतली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील वैद्यकीय, कृषी, उच्च व तंत्र शिक्षणाच्या आरक्षण, शिष्यवृत्ती व प्रवेशाच्या धोरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच शिक्षण क्षेत्रातील काही अडचणी सोडविण्यासाठी निवेदन दिले गेले. यावेळी मुख्यमंत्री यांनी सदरच्या विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निवेदनातील विषय मार्गी लावू असे आश्वासन प्रा. रामदास झोळ यांनी माहिती दिली आहे.




Post a Comment