करमाळा तालुक्याचे सुपुत्र अमोल जाधव यांनी 1 मे कामगार दिनाच्या औचित्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. तसेच त्यांची कामगारांबद्दल आपुलकी व कामाची जिद्द पाहून श्रमिक कामगार सेना शिंदे गट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश मोहिते, यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण व महाराष्ट्र संघटक विजय लोळे यांच्या नेतृत्वाखाली, गुरुवार दि. 12/06/2025 रोजी शासकीय विश्राम गृह करमाळा येथे अमोल जाधव यांची श्रमिक कामगार सेना (शिवसेना शिंदे गट) सोलापूर जिल्हाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
निवडीनंतर जाधव म्हणाले कि प्रत्येक तालुक्यातील, गावातील तसेच शहरातील संघटित-असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी व संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच श्रमिक कामगार सेनेचा नावलौकिक वाढवून संघटना वाढीसाठी प्रयत्न करुन नागरिकांना शिवसेना पक्षाचे लक्ष व धोरणे समजावून, श्रमिक कामगार सेनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम तन-मन-धनाने करेन.
यावेळी शिवसेना (शिंदे गट) तालुका उपाध्यक्ष दादासाहेब तनपुरे, युवासेना शहरप्रमुख विशाल गायकवाड, पै.आदित्य जाधव, भाळवणी सरपंच पांडुरंग वाघमारे, पिंपळवाडी उपसरपंच दत्तात्रय चव्हाण, नवनाथ काळे, भीमराव नाळे, चेतन आव्हाड, मजनू शेख, मदन अडसूळ, आर्यन भोसले, रोहन परदेशी, योगेश बेंद्रे, अविनाश वाघमारे, अमोल भोसले, स्वप्निल कांबळे, सुशील गायकवाड, गणेश झिंजाडे, सोनू भोसले, सोनू वाघमारे, तसेच करमाळा तालुका व शहरातील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment